अरे थांब …… . कुठे निघालास …… माझं थोडं ऐकशील का ? …हे तर माझं पण ऐकायला तयार नाही… ओ नो … कुठं बरं गेलं असेल ..?
हे सगळं तुमच्या बद्दल बरोबर पण होत असेल… खर पाहिलं तर हे सर्वस्वी आपलं असूनही थोडही आपलं ऐकत नाही … अरे हो तुम्हाला तर सांगायच राहूनच गेलं कि मी कोणाबद्दल बोलतोय…. सर्वस्वी आपलं ,स्वच्छंदी , बिनधास्त असं आपलं मन …. खरं सांगा तुमचं तरी ऐकत का हो हे …?
पण ह्याच्या विरुद्ध पाहिलं तर जे आपलं नाही , ज्यावर आपला अधिकार हि नाही त्यावर आपण आपला हक्क गाजवायला लागलोय… मी बोलतोय आजच्या आपल्या समाजात , प्रत्येक घरात बंदिस्त असणाऱ्या स्त्री बद्दल …. जिला पूर्णता हक्क आहे आपलं मत मांडण्याचा , मनाप्रमाणे वागण्याचा … पण काही ठिकाणी आजही स्त्री बंदिस्त आहे चार भिंती मध्ये , एका चोकटीत …. काही प्रमाणात स्त्री मुक्त झालीय जरूर… पण १००% नक्कीच नाही…. तिला पूर्णतः स्वतंत्र , मुक्त करण्याची आज गरज आहे …
चला तर पाहूया अश्याच एका छान विषयावर मी काढलेलं एक सुंदर चित्र …. ज्यामध्ये किमयागारानी निर्माण केलेली मन हि रचना आणि त्यामध्ये १००% मुक्त मनाच्या दुनियेत असणारी ती स्त्री..
ही पैंटिंग अश्याच एका बंदिस्त स्त्रीच्या मनात उठणाऱ्या भावनांवर आधारित आहे.. मुख्य भागात ती एका चौकटीत बंदिस्त अशी दर्शवली आहे जिला मुक्त व्ह्याच आहे … आणि दुय्यम भागात तिच्या मनाची अवस्था एका फुलपाखराच्या माध्यमातून दाखविली आहे … ती स्वतः एका स्वच्छंदी ,मुक्त जगामध्ये बागडतेय … तिचा हक्क आपण हिरावून घेता कामा नये…
पैंटिंग बद्दल सांगायचं झालं तर हे गॅलरी पेस्टल्स आणि डेरीवेन्ट पेस्टल्स पेंसिल्स मध्ये बनविले आहे … त्याच्या काही पोस्ट मी खाली अपलोड करतोय नक्की पहा..
आणि माझी हि रचना आपल्याला कशी वाटली नक्की कळवा … मी तुमच्या कंमेंट्स ची आणि लाईक्स ची वाट पाहतोय …
मुक्त रहा , आनंदी राहा , मुक्त राहूद्या ….. भेटूया अश्याच एका नवीन पैंटिंग आणि त्यावरच्या लेखासहित तोपर्यंत नमस्कार …
जय हिंद !!!! जय भारत !!!!
Nice thought
Thanks dear ❤️☺️